
General knowledge : भारताच्या जवळपास सगळ्याच भागांत मे महिन्यात तापमानाचा पारा वाढलाय. त्यामुळे सगळ्याच मध्यमवर्गीय ते उच्च मध्यमवर्गीयांच्या घरात तुम्हाला एसीचा वापर दिसून येईल. मात्र एसीला रोज बघताना तुम्हाला कधी असा प्रश्न पडला काय की एसीचा कलर हा पांढरा का असतो? एसीचे दोन मुख्य प्रकार आहेत. स्प्लिट आणि विंडो. एसीसाठी पांढऱ्याच रंगाची निवड का करण्यात आली ते आपण आज जाणून घेऊयात.
माहितीसाठी एसीमध्ये एक युनिट असतो जो बाहेरच्या दिशेने असतो. तर स्प्लिट एसीमध्ये इनडोअर आणि आऊटडोअर असे दोन युनिट असतात. या दोन्हींमध्ये बाहेर असणारा युनिट हा कायम पांढऱ्या रंगाचा असतो.
एसीचा रंग पांढराच का असतो?
९९ टक्के घराच्या आत असलेले एसी युनिट पांढऱ्या रंगाचे असतात. काही कंपन्या इंटेरियरच्या हिशोबाने त्यात काही बदल करतात आणि त्यात काही कलर ऑप्शन्स देतात. चला तर यामागचं कारण आपण जाणून घेऊया. पांढरा रंग (White Color) सनलाइट आणि हिटला रिफ्लेक्ट करते. त्यामुळे हिटचे अॅबझॉर्प्शन कमी होते. आणि एसी यूनिट कमी तापते. (Electronic Gadgets)
पांढऱ्या रंगामुळे एसी युनिट कमी गरम होत असल्याने मशीनच्या आत असलेल्या काँप्रेसरमधली हिट वाढली तरी पांढऱ्या रंगामुळे ती कमी होते. याच कारणाने विंडो किंवा स्प्लिट एसीचे आउटडोअर युनिट थेड उन्हात न लावण्याचा सल्ला दिला जातो. (Electricity)
जर युनिट सावलीत असेल तर एसीच्या कूलींगसाठी कमी वेळ लागतो. यामुळे कूलिंगही लवकर होते आणि विजेची बचतही होते. यासह आणखीही अनेक फायदे आहेत. एसीला डार्क कलर दिल्यास त्यातील हिट वाढू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.