Generation Beta: मिझोरममध्ये भारतातील पहिल्या जनरेशन बीटा बाळाचा जन्म; नाव काय ठेवलंय?
Frankie Remruatdika Zadeng: २०२५ ते २०३९ या काळात जन्मलेल्या मुलांना नव्या युगाचं प्रतिक मानलं जात आहे. या दरम्यान जन्म घेतल्या मुलांना जनरेश बीटा म्हणून संबोधलं जाईल. फ्रँकी हा जनरेशन बीटाचा भारतातला पहिला मुलगा आहे.
नवी दिल्लीः मिझोरममध्ये एक बाळ ऐतिहासिक क्षणाचा साक्षिदार ठरलं आहे. भारतातल्या पहिल्या जनरेशन बीटा बाळाचा जन्म १ जानेवारी २०२५ रोजी १२ वाजून ३ मिनिटांनी झाला. मिझोरमच्या आयझॉल येथील सिनॉड हॉस्पिटल, डर्टलांग येथे बाळाचा जन्म झाला झाला.