Viral : तरूणीने स्विगीवरून मागवले सॅनिटरी नॅपकीन अन् बॅगमध्ये निघालं...

स्विगी कंपनीनेही तिच्या ट्वीटची दखल घेत रिप्लाय केला आहे.
Swiggy
SwiggySakal

आपण अनेकवेळा फूड डिलीव्हरी अॅपवरून अन्न पदार्थ मागवत असतो. आता तर भाजीपाला आणि किराणा सामानसुद्धा ऑर्डर करता येते. तर इतर वस्तूही ऑर्डर करण्याची सोय आता उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण सध्या एका मुलीने स्विगी या डिलीव्हरी अॅपवरून सॅनिटरी नॅपकीन ऑर्डर केल्यावर तिला त्या ऑर्डरमध्ये दुसऱ्या वस्तू मिळाल्याचं समोर आलं.

हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

समिरा असं या मुलीचं नाव असून तिने ट्वीटरवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. तिने आपल्या ट्वीटर पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "मी स्विगीवरून सॅनिटरी नॅपकीन मागवले होते. पण मला ऑर्डरबरोबर बॅगमध्ये चॉकलेट कुकीज मिळाले, मला कळाले नाही हे नेमकं कुणी केलं? दुकानदाराने की स्विगीने?" असं ट्वीट समिराने केलं आहे.

दरम्यान, तिच्या या ट्वीटची दखल घेत स्विगीने तिला ट्वीटरवर रिप्लाय दिला आहे. "तुमचा पुढचा दिवस चांगला जावा अशीच आमची इच्छा आहे." असा रिप्लाय स्विगीच्या अधिकृत अकाउंटवरून देण्यात आला आहे. सध्या हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत असून मुलींच्या मासिक पाळीमध्ये कुकीज खायला दिल्यामुळे अनेकांनी स्विगी आणि दुकानदाराचे कौतुक केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com