Video: "पापा की परी ब्रेक सिस्टीम" मुलीने ब्रेक न लावताच गाडी ठोकली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Video: "पापा की परी ब्रेक सिस्टीम" मुलीने ब्रेक न लावताच गाडी ठोकली

काहीजणांना गाडी चालवता येत नसतानाही रस्त्यावर गाडी चालवण्याचे धाडस करतात. तर गाडी चालवण्याच्या संदर्भात महिलांना आणि मुलींना सोशल मीडियात सारखं ट्रोल केलं जातं. मुलींच्या गाडी चालवण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

(Girl Driving and Accident Viral Video)

दरम्यान, या व्हिडिओमध्ये एक मुलगी पाय खाली सोडून गाडी चालवत आहे. त्या मानाने गाडीचा वेग हा खूप नाहीये पण तिला वेगावर नियंत्रण नसून ती पाय खाली सोडून ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे. पुढे चौकात गेल्यावर ती गाडीला ब्रेक न लावता समोर आलेल्या गाडीला जाऊन धडकते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत असून "पापा की परी अन् ब्रेक सिस्टीम" असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे. यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.