
Viral Video : नवरीला माळ घातली अन् नवरदेवाने हवेत केला गोळीबार
काहीजण आपलं लग्न धुमधडाक्यात लावण्यासाठी प्रयत्नशील असतात. तर नवरदेवाची मित्रही आपल्या मित्राच्या लग्नात पार्टी करत, डान्स करत धुमाकूळ घालत असतात. पण लग्नामध्ये कोण गोळीबार करतं का? आपण हे ऐकून आश्चर्यचकित व्हाल पण हो. हे खरं आहे. याप्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा - ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लग्न सुरू असलेलं आपल्याला दिसत आहे. पण लग्न लागल्यानंतर नवरदेव नवरीच्या गळ्यात माळा घालतो. त्यानंतर दोघेही आपल्या हातात बंदूक पकडून हवेत गोळीबार करतात. गोळीबाराच्या आवाजानंतर नवरी घाबरून डोळे मिटून घेते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
दरम्यान, इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून मयंक पुरानी या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तर अनेक युजर्सने हा व्हिडिओ लाईक केला आहे.