Marriage Viral Video : एकेकाची अजब तऱ्हा! घोडीवरुन नव्हे शवपेटीतून घेतली लग्नात एन्ट्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marriage Viral Video

Marriage Viral Video : एकेकाची अजब तऱ्हा! घोडीवरुन नव्हे शवपेटीतून घेतली लग्नात एन्ट्री

Groom Reached To His Marriage Cerimony In Coffin : लग्नसोहळा हा प्रत्येक नवरदेव-नवरीच्या आयुष्यातला एक खास क्षण असतो. तो संस्मरणीय करण्याचा प्रयत्न असतो. मग त्यासाठी कोण काय शक्कल लढवेल याचा काही नेम नसतो. त्यामुळे सगळ्यांच्या या अतरंगी तऱ्हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात.

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धूम चालत आहे. नवरदेव नवरीच्या एंट्रीवर स्मोकरचा धूर सोडून स्वर्गात असल्याचा भास निर्माण केला जातो. काही लोक हिरो हिरोइन सारखी वरून कुठून तरी एंट्री करतात. तर काही हेलिकॉप्टरमधून लग्न मंडपात एंट्री घेतात. पण या पठ्ठ्याने तर कहरच केला.

हा नवरदेव चक्क शवपेटीतून आपल्या लग्न मंडपात पोहचला. जिथे लग्नाला शुभ कार्य मानलं जातं तिथं मृत्यूच्या अशुभ यात्रेचं स्वरूप देण्याचं धाडस या नवऱ्यामुलानं केलं. त्यामुळे बघणाऱ्यांनी डोक्याला हातच लावला.

टॅग्स :marriageviral video