
प्रयागराज, पूर्वीचे इलाहाबाद, हे प्रशासकीय आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. येथील गोरा कब्रिस्तान हे ब्रिटिश काळातील एक महत्त्वाचे प्रतीक आहे, जिथे 1857 च्या क्रांतीत मृत्यूमुखी पडलेल्या 600 हून अधिक ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या कबरी आहेत. बैरहना परिसरात असलेल्या या स्मशानभूमीची देखभाल सरकार करते, पण संध्याकाळी 6 नंतर येथे प्रवेश निषिद्ध आहे. यामागील कारण आहे येथील भूतकथेची दहशत!