
Elephant calf crushed by truck in forest area: आई आणि बाळाच नातं हे जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ असतं. मग ते मानवासह प्राण्यांमध्ये ही असं दिसून येतं. सोशल मिडियावर अनेक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण सध्या एक भावनिक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुमच्याही डोळ्यातही पाणी येईल. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत मादी हत्ती तिच्या मेलेल्या बाळाजवळ तासनतास उभी राहून रडतांना दिसत आहे. हा हृदयद्रावक हत्तीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना मलेशियातील असल्याचे सांगितले जात आहे.