...अन् बघता बघता घरं गेले बर्फाखाली; घटनेचा धक्कादायक Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

...अन् बघता बघता घरं गेले बर्फाखाली; घटनेचा धक्कादायक Video Viral

हिमालयात बर्फ पडतो. आपल्या वातावरणापेक्षा कितीतरी पटीने कमी तापमान तिथे असतं. शून्यापेक्षाही कमी तापमान असल्यामुळे तिथे पडणाऱ्या बर्फाचे प्रमाण जास्त असते. तर हिमवादळामुळे अनेक घरं बर्फाखाली बुडाल्याची परिस्थिती तिथे निर्माण होते. बर्फाखाली अनेक घरे बुडाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

सलग दोन दिवस एका ठिकाणी कॅमेरा लावून शूट केलेला हा व्हिडिओ आहे. त्याचा टाईमलॅप्स करून त्याला ६० सेकंदात म्हणजे एका मिनीटात कन्व्हर्ट केलं आहे. यामध्ये आपल्याला बर्फाखाली घरे बुडाल्याचं दिसत आहे. दोन दिवसांत सात ते आठ फुटाचा बर्फाचा थर जमा झाल्यामुळे घरे, गाड्या, वस्तू बुडाल्या आहेत.

हेही वाचा: Viral Video : डान्स करताना आंटीचे जोरात ठुमके; पाय घसरला अन् साडी...

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हळूहळू बर्फाची जाडी वाढताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशळ मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला असून या व्हिडिओला तीस लाख लोकांनी पाहिलं आहे. तर ८४ हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं असून अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :old age homeviral video