हॉस्टेलच्या चपात्या दगडापेक्षा कडक; विद्यार्थ्यांकडून संताप, Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video Viral

हॉस्टेलच्या चपात्या दगडापेक्षा कडक; विद्यार्थ्यांकडून संताप, Video Viral

आपण किंवा आपल्या ओळखीतील अनेक जण शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घराच्या बाहेर शहरात हॉस्टेलवर राहिले असतील किंवा सध्या काहीजण राहत असतील. होस्टेलच्या अन्नाची चव आणि दर्जा यासंदर्भात अनेकांच्या तक्रारी असतात. तर अनेकदा विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळतो. सध्या होस्टेलमधील एका तरूणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला असून ती चपाती टेबलावर आपटून दाखवत आहे. "हे पाहा होस्टेलचे अन्न, या अन्नाला कसं खायचं?" असं ती या व्हिडिओत म्हणत आहे. तर ही चपाती एवढी कडक आहे की आदळली तरी तुटत नाही. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

हा व्हिडिओ पाहून अनेक विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त केला असून आपले अनुभव शेअर केले आहेत. पण हा व्हिडिओ कोणत्या होस्टेलवरील आहे ही अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. सकाळ माध्यम या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.