
तुळजापूर सध्या एका अनोख्या कारणामुळे चर्चेत आहे. याचं कारण आहे हॉटेल भाग्यश्री आणि त्याचे मालक नागेश मडके, ज्यांनी फक्त स्वादिष्ट मटण थाळीच नाही, तर सोशल मीडियावरही धुमाकूळ घातलाय. “नाद करतो काय, यावचं लागतंय!” या हटके टॅगलाइनसह हॉटेल भाग्यश्री महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालंय. त्यांचे नुकतेच इंस्टाग्रामवर 3 लाख फॉलोअर्स पूर्ण झाले. त्याचा त्यांनी व्हिडिओ देखील इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.