
Nagesh Madke: मराठवाड्यातला नादखुळा रस्सा आणि ढवारा मटण घेऊन राज्याच्या कोनाकोपऱ्यात हॉटेल भाग्यश्री पोहोचलेलं आहे. हटके स्टाईल, स्वस्तात थाळी आणि वाट्टेल तेव्हा दांड्या.. यामुळे हे हॉटेल जसं ट्रोल झालं तसं चर्चेततही आलं. हॉटेल मालक नागेश मडके यांचा वावर आता एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. लोक सेल्फी घेतात, उद्घाटनाला बोलावतात अन् हॉटेलवर तुफान गर्दी करतात.