
Viral video
१६ एप्रिल १८५३ हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. याच दिवशी भारतातील पहिली प्रवासी रेल्वे मुंबईतील बोरी बंदर (आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथून ठाण्यापर्यंत धावली. हा ३४ किलोमीटरचा प्रवास भारतीय रेल्वेच्या क्रांतिकारी इतिहासाचा प्रारंभ होता. ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेने (GIPR) आयोजित या प्रवासात १४ डब्यांच्या रेल्वेला तीन शक्तिशाली स्टीम इंजिन्स - साहिब, सिंध आणि सुलतान - यांनी ओढले. या गाडीत ४०० प्रवाशांनी ऐतिहासिक प्रवासाचा अनुभव घेतला, ज्याने भारताच्या वाहतूक क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात केली.