Viral Video : डान्स आहे की चक्रीवादळ? आंटीचा भयानक डान्स; प्रेक्षकही घाबरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : डान्स आहे की चक्रीवादळ? आंटीचा भयानक डान्स; प्रेक्षकही घाबरले

डान्स हा अनेकांच्या आवडीचा विषय असतो. काही लोकांना डान्स करण्यासाठी व्यासपीठाची गरज नसते. कुठेही गाणे लागले की त्यांचा डान्स सुरू होतो. सध्या अशाच एका डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून तुम्हीही घाबरून जाल. महिलेचा कर्कश आवाज आणि डान्स पाहून थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ गावातील एका कार्यक्रमातील असून एक महिला माईक हातात घेऊ मोठा कर्कश आवाज करताना दिसत आहे. तर त्यानंतर ती सैरावैरा पळत असून वादळासारखी इकडे तिकडे फिरून डान्स करताना दिसत आहे. प्रेक्षकांच्या मध्ये जाऊनही ही महिला डान्स करत असून तिचा हा अवतार पाहून अनेकजण घाबरलेले दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून "हा डान्स आहे की चक्रीवादळ डान्स" असा प्रश्न आपल्यालाही पडल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

टॅग्स :womendanceviral video