Viral Video : विमानात चक्क भोजपुरीतून Announcement; पाहा व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

viral

Viral Video : विमानात चक्क भोजपुरीतून Announcement; पाहा व्हिडिओ

आपण आपली भाषा जपली पाहिजे, वापरली पाहिजे... भाषा संवर्धनासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर खूपजण आपली मातृभाषा सोडून इतर भाषा वापरतात. काहीजण कुठेही गेले तरी आपली भाषा सोडत नाहीत. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एक कर्मचारी विमानातील प्रवाशांना भोजपुरी भाषेतून संबोधन करताना या व्हिडिओत दिसत आहे.

(Announcement in Bhojpuri Viral Video)

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा इंडिगो विमानातील आहे, तर एक कर्मचारी प्रवाशांना संबोधित करताना प्रवाशांना आधी भोजपुरी भाषा येते का हे विचारतो. त्यानंतर भोजपुरीमधून बोलताना दिसत आहे. तर दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छाही देत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावरील मंडळींचे मनोरंजन होत असते. तर काही चांगले व्हिडिओ आपल्याला प्रेरणा देत असतात. तर हा व्हिडिओ आपल्या मातृभाषेला न विसरण्याची प्रेरणा देतो.