Indonesia Siblings Viral Video : सोशल मीडियावर चिमुकल्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. यामध्ये काही व्हिडीओ डान्सचे तर काही व्हिडीओ चिमुकल्यांच्या गाण्यांचे असतात. असाच दोन चिमुल्यांच्या गाण्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत दोघं बहीण-भाऊ 'कहो ना प्यार है' हे गाणं म्हणताना दिसत आहेत. सोशल मीडियावर या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरु आहे.