इस्त्राईलच्या ज्यू व्यक्तीने गायलं शिवाजी महाराजांचा गौरव करणारं मराठी गाणं | Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

इस्त्राईलच्या ज्यू व्यक्तीने गायलं शिवाजी महाराजांचा गौरव करणारं मराठी गाणं | Viral Video

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या इस्त्राईलच्या एका ज्यू व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पन्नास वर्षांपूर्वी इस्त्राईल मध्ये स्थायिक झालेल्या व्यक्तीने जे गाणे सादर केले ते ऐकून आपणही थरारुन जाल. अशीच आमुची आई असती... हे गाणं त्याने गायलं आहे.

दरम्यान, अनेक ज्यू धर्मीय लोकं भारतात राहत होते पण ते कालांतराने इस्त्राईलला स्थलांतरित झाले. पण त्यांची भारतीय संस्कृतीशी जोडलेली नाळ अजूनही तशीच आहे. सध्या या ज्यू धर्मीय व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्याने "हो हो अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती... आम्ही ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती" हे गाणं गायलं आहे.

हे गाणं गाताना त्याने हार्मोनियम वाजवलं आहे.त्याच्या गाण्याचा सूर आणि सुमधूर गायन ऐकून आपलेही कान तृप्त होतील. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा आपल्यासाठी कौतुकाचा क्षण आहे, कारण छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचा पगडा अनेकांवर आजही आहे.