Indian Army ला कडक सॅल्यूट! गर्भवती महिलेसाठी जवान बनले 'देवदूत'; हेलिकॉप्टरनं नेलं रुग्णालयात

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये गेल्या 7 दिवसांपासून सतत बर्फवृष्टी होत आहे.
Indian Army
Indian Armyesakal
Summary

हिमस्खलनामुळं अनेकांचे जीव धोक्यात आले असताना भारतीय लष्कर देवदूत म्हणून पुढं येत आहे.

Jammu Kashmir Snowfall : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये (Jammu and Kashmir Srinagar) गेल्या 7 दिवसांपासून सतत बर्फवृष्टी होत आहे. येथील लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. बर्फवृष्टीमुळं नागरिकांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून रस्ता जाम झालाय.

लोकांना एका ठिकाणाहून दुसरीकडं जाता येत नाहीये. दरम्यान, गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी भारतीय लष्कर (Indian Army) देवदूताच्या रूपात पुढं आलं. लष्करानं खूप प्रयत्नांनंतर गर्भवती महिलेला (Pregnant Women) रुग्णालयात नेलं. महिलेला खूप त्रास सहन करावा लागत होता, पण प्रचंड बर्फवृष्टीमुळं रस्ते बंद झाल्यामुळं ती घरातच कैद होती. सुरक्षा दलांशी संपर्क साधल्यानंतर, त्यांनी महिलेला हेलिकॉप्टरमधून सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल केलं.

Indian Army
Khashaba Jadhav : शाहू महाराजांच्या वंशजांनी व्यक्त केलेली 'ती' खंत योग्यच; असं का म्हणाले खाशाबांचे सुपूत्र?
Indian Army
Indian Armyesakal

संरक्षण मंत्रालयाच्या पीआरओनं सांगितलं की, रविवारी एका गर्भवती महिलेला गंभीर अवस्थेत घरातून रुग्णालयात नेण्यात आलं. मुसळधार बर्फवृष्टीमुळं महिलेला श्रीनगरमध्ये NH 701 द्वारे उत्तम वैद्यकीय सुविधा देण्यासाठी घराबाहेर काढण्यात आलं. जिथं त्यांना चांगले उपचार मिळू शकत होते.

Indian Army
Ram Rahim Parole : बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेला राम रहीम पुन्हा तुरुंगाबाहेर येणार? सत्संगासाठी मागितला पॅरोल

दुसरीकडं, हिमस्खलनामुळं अनेकांचे जीव धोक्यात आले असताना भारतीय लष्कर देवदूत म्हणून पुढं येत आहे. सरबल गावाजवळील मेघा इंजिनीअरिंग अँड इंडस्ट्री लिमिटेडच्या वर्कशॉप परिसरात मोठ्या हिमस्खलनात अडकलेल्या कंपनीच्या सर्व 172 कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आलीये. हे मजूर झोजिला बोगद्याच्या कामात व्यस्त होते. सध्या भारतीय लष्कराच्या जवानांनी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू केलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com