
एक महिला पतीला सावर्जनिक ठिकाणी हेल्मेटने बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तूफान व्हायरल होत आहे. पती मेहुणीसोबत फिरत असल्याची माहिती मिळताच पत्नी तिथे पोहोचली आणि तिने पतीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला तरी महिला कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. हा प्रकार राजस्थानच्या जोधपूरमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडल्याचे सांगण्यात येत आहे.