

Jose Salvador Alvarenga survived 438 days adrift in the Pacific Ocean
esakal
Who Is Jose Salvador Alvarenga? आजूबाजूला नजर जाईल तिथपर्यंत केवळ अथांग समुद्र, पिण्यासाठी गोडे पाणी नाही, खाण्यासाठी अन्न नाही आणि मदतीसाठी कुणीही जवळ नाही. अशा परिस्थितीत एक-दोन दिवस नव्हे, तर तब्बल ४३८ दिवस समुद्रात एकट्याने जगणे शक्य आहे का? मेक्सिकोचा मासेमार जोसे साल्वाडोर अल्वारेंगा याने प्रत्यक्षात हा अशक्य वाटणारा संघर्ष केला. नोव्हेंबर २०१२ मध्ये मासेमारीसाठी समुद्रात गेलेला हा माणूस वादळामुळे दिशाहीन झाला आणि हजारो मैल दूर प्रशांत महासागरात वाहत गेला. तब्बल १४ महिन्यांहून अधिक काळ मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ३० जानेवारी २०१४ रोजी तो मार्शल बेटांवरील एका निर्जन किनाऱ्यावर पोहोचला. त्याच्या या अनुभवावर पुढे जोनाथन फ्रँकलिन यांनी ‘४३८ डेज’ हे पुस्तक लिहिले.