Viral Video: एका लहानग्याच्या हट्टामुळे बदलला संपूर्ण आंगणवाडीचा मेन्यू...केरळ सरकारचा निर्णय चर्चेत; व्हिडिओ एकदा पाहाच!

Child's Biryani Request Sparks State-Wide Menu Reform: चार वर्षांच्या मुलाच्या बिर्याणीच्या हट्टामुळे केरल सरकारने आंगणवाडीचा संपूर्ण मेन्यू बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
Viral Video of Kerala Boy Changes Government Nutrition Plan
Viral Video of Kerala Boy Changes Government Nutrition Plansakal
Updated on

Kerala Anganwadi Food Policy Updated After Child’s Video Goes Viral: सोशल मीडियावर नेहमीच काहीना काही व्हायरल होत असतं. कधी एखादा हास्यास्पद व्हिडिओ, तर कधी हृदय पिळवटून टाकणारा, तर काही वेळेस लहान मुलांचे सौम्य आणि गोंडस असे व्हिडिओ व्हायरल होतात. ज्यातून फक्त आणि फक्त त्यांचा निरागसपणा आपल्याला पाहायला मिळतो.

केरल मधील असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे केरळ सरकारने एक मोठ निर्णय घेतला आहे. जो सगळ्यांच्याच चर्चेचा विषय बनला आहे.

केरळमधल्या एका लहान मुलाच्या साध्या मागणीमुळे राज्यभरातील आंगणवाड्यांमध्ये आता पोषणमूल्यांनी भरलेलं नवीन जेवण देण्याची सुरुवात झाली आहे. चार वर्षांच्या शंकू नावाच्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर केरळ सरकारने आंगणवाड्यांच्या जेवणाच्या यादीत मोठा बदल केला आहे.

शंकूच्या हट्टाने वेधलं सरकारचं लक्ष

फेब्रुवारी २०२५ मध्ये शंकू उर्फ रिजुल एस सुंदर याने आपल्या आईशी बोलताना सांगितलं की, त्याला आंगणवाडीत उपमा नको, तर बिर्याणी आणि फ्रायड चिकन खायचं आहे. त्याच्या आईने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला. काही वेळातच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री वीणा जॉर्ज यांच्या पर्यंत पोहोचला.

मंत्री वीणा जॉर्ज यांची प्रतिक्रिया

हा व्हिडीओ पाहून वीणा जॉर्ज यांनी शंकूला वचन दिलं की आंगणवाड्यांच्या जेवणाच्या यादीत बदल केला जाईल. काही महिन्यांतच त्यांनी आपलं वचन पाळत नवीन जेवणाची योजना सुरू केली. राज्यातील आंगणवाड्यांमध्ये आता आठवड्यातून तीन दिवस अंड्याचं वितरण केलं जाईल आणि अंडा बिर्याणीही मेन्यूमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

भरपूर पोषण घटकांचा नवीन मेन्यू

आता आंगणवाड्यांमध्ये मिळणाऱ्या जेवणात अंडा बिर्याणीसोबतच न्यूट्री लाडू (प्रोटीन आणि फायबरयुक्त पौष्टिक लाडू), डाळ पायस (गूळ, नारळाचं दूध, डाळ आणि वेलचीसह बनवलेली पारंपरिक गोड खीर), रागी अडा (नाचणीपासून बनवलेला पारंपरिक पदार्थ), सोया ड्राय फ्राय आणि गव्हाचा पुलाव देखील समाविष्ट करण्यात आला आहे.

राज्यात प्रथमच सर्वांसाठी एकसारखी आहार योजना

वीणा जॉर्ज यांनी सांगितलं की, राज्यात पहिल्यांदाच सगळ्या आंगणवाड्यांसाठी एकसारखा जेवणाचा मेन्यू तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे मुलांना अधिक पोषण मिळेल.शंकूसारख्या चिमुकल्याच्या एका साध्या इच्छेमुळे राज्यातल्या अनेक मुलांना चांगलं, आरोग्यदायी जेवण मिळणं ही खरंच आनंदाची आणि कौतुकास्पद गोष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com