Video: कारमध्ये आधी कोण जाणार? पुतिन आणि किम जोंग ऊनमध्ये भांडण? व्हिडिओ होतोय व्हायरल

Kim Jong Un and Vladimir Putin Viral Video: पुतिन हे जेव्हा कोरियाची राजधानी सिओल येथे आले तेव्हाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
viral video
viral video
Updated on

नवी दिल्ली- रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन हे दोन दिवसांच्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. पुतिन हे जेव्हा कोरियाची राजधानी सिओल येथे आले तेव्हाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांसाठी हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, पुतिन आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग ऊन एकमेकांना कारमध्ये बसण्याचा आग्रह करत आहेत.

आधी तुम्ही..नाही.. आधी तुम्ही...अशा प्रकारचा प्रसंग या दोन नेत्यांमध्ये झाला आहे. पुतिन उत्तर कोरियामध्ये आले होते. विमानतळावर उतरल्यानंतर किम जोंग ऊन यांनी पुतिन यांचे स्वागत केले.

पुतिन यांना हॉटेलमध्ये घेऊन जाण्यासाठी एक आलिशान कार आली होती. यावेळी किम जोंग ऊन यांनी पुतिन यांना गाडीत बसण्याचा आग्रह केला, पण पुतिन यांनी आधी किंम जोंग ऊन यांनी गाडीत बसावं असा आग्रह केला. दोन्ही नेत्यांमध्ये काहीवेळ आधी तुम्ही, आधी तुम्ही असा प्रसंग सुरू होता. त्यांनतर पुतिन हेच आधी गाडीमध्ये जाऊन बसतात. त्यानंतर किम जोंग ऊन देखील त्याच कारमध्ये जाऊन बसतात.

viral video
Viral Video : मोदींच्या कॅबीनेट मंत्र्यांना लिहिता आलं नाही 'बेटी बचाव बेटी पढाओ'; तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ

कारमध्ये आधी कोण जाणार यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये संकोचाचा प्रसंग घडला. डेली मेल ऑनलाईनने यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. कारमध्ये आधी कोण जाईल यावरून किम जोंग ऊन आणि व्लादीमीर पुतिन यांच्यामध्ये वाद झाल्याचा दावा यातून करण्यात आला आहे.

नेटकऱ्यांनी यावेळी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं की, कारमध्ये बॉम्ब असल्याचं दोन्ही नेत्यांना वाटत होतं. त्यामुळे ते एकमेकांना आधी बसण्यास सांगत होते. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांनंतर पुतिन यांनी उत्तर कोरियाला भेट दिली आहे. यावेळी दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे करार झाल्याचं सांगण्यात येतं. उत्तर कोरियावर हल्ला झाल्यास मदतीला येऊ, असा शब्द पुतिन यांनी किम जोंग ऊन यांना दिला आहे.

viral video
Viral Video: काय सांगता! अ‍ॅमेझॉनवरून ऑर्डर गेलेल्या पार्सलमध्ये आढळला जिवंत कोब्रा; पाहा धक्कादायक व्हिडिओ

दरम्यान, किम जोंग ऊन यांनी मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये रशियाला भेट दिली होती. यावेळी पुतिन यांनी त्यांना शस्त्र सज्ज एक आधुनिक वाहन दाखवले होते. किम पुतिन यांच्या बाजूलाच बसले होते. यावेळी ते प्रवासाचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळालं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.