
'कोरियाचा हुकूमशाहा' पोहचला फिफाचा अंतिम सामना पाहायला; Photo, Video Viral
फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना कतारमध्ये पार पडला. या सामन्याकडे आख्ख्या जगाच्या नजरा खिळल्या होत्या. फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्या दरम्यान हा सामना खेळला गेला. अखेर अर्जेंटिनाने या सामन्यात विजय मिळवला आणि विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे उत्तर कोरियाचा तानाशाह किम जोंग उन यांच्यासारखा दिसणारा हॉवर्ड एक्स हासुद्धा या सामन्यासाठी उपस्थित होता.
हेही वाचा - ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...
दरम्यान, हॉवर्ड एक्स यांनी आपल्या ट्वीटरवरून हे फोटो शेअर केले आहेत. ते कतारमध्ये अनेक चाहत्यांचे केंद्रबिंदू ठरले. तर अनेक लोकांना त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. विशेष म्हणजे तानाशाह किम जोंग उन यांच्यासारखा दिसणारा हॉवर्ड एक्स हा किम जोंग उन हेच असल्याचं आपल्याला भासेल.
दरम्यान, फिफाचा पुढील विश्वचषक उत्तर कोरियामध्ये आयोजित करण्यास आयोजक तयार असल्याची माहितीही त्याने ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे. २०१८ मध्ये रशिया, २०२२ मध्ये कतार आणि त्यानंतर आता पुढील फिफा विश्वचषक उत्तर कोरियामध्ये होईल असंही त्याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.