कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील प्रसिद्ध कुक्के सुब्रह्मण्य मंदिरात नुकताच एक अनोखा प्रसंग घडला. मंदिरातील मुख्य हत्तीणी यशस्विनी हिने एका कर्मचाऱ्याला ढकलून दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे..धार्मिक विधीदरम्यान घडली घटनाही घटना तीर्थवारी या धार्मिक विधीदरम्यान घडली. भक्त हत्तीणीवर अभिषेकासाठी पाण्याचा वर्षाव करत होते. याच वेळी एका कर्मचाऱ्याने हा विधी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र यशस्विनीने त्याला पाण्याकडे ढकलले. व्हिडिओप्रमाणे की तिने कर्मचाऱ्याला उचलून बाजूला टाकले..Shegaon Viral Video: का चर्चेत असते शेगावची पार्किंग व्यवस्था? जगातील एकमेव सेवार्थ हायटेक वाहनतळ, माऊली व्हिडिओ पाहिल्यावर कळेल सत्य.कुक्के सुब्रह्मण्य मंदिरात यशस्विनी ही हत्तीणी गेल्या अनेक वर्षांपासून भक्तांची प्रिय आहे. ती दररोजच्या पूजा, मिरवणुका आणि तीर्थवारीसारख्या विधींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. कर्मचाऱ्यांसोबत तिचा जवळचा संबंध असला तरी प्रशिक्षित हत्तींच्या स्वाभाविक ताकदीमुळे असे प्रसंग कधीकधी घडतात..व्यवस्थापनाबाबत पुन्हा एकदा चर्चाहा व्हिडिओ यूट्यूब, रेडिट आणि इतर प्लॅटफॉर्मवर लाखो व्ह्यूज मिळवत आहे. यामुळे मंदिरातील हत्तींच्या काळजीबाबत आणि त्यांच्या व्यवस्थापनाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी यशस्विनीच्या या कृतीला भक्तांच्या विधीचे रक्षण करणारे वर्तन म्हणून पाहिले, तर काहींनी हत्तींना मंदिरात ठेवण्याच्या प्रथेलाच विरोध दर्शवला..मंगळुरुपासून जवळ असलेल्या या प्राचीन मंदिरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनाला येतात. यशस्विनी ही हत्तीणी त्यांच्यासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. सध्या हा व्हिडिओ पाहून अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत, तर काहींनी मंदिर प्रशासनाने हत्तींच्या प्रशिक्षण आणि काळजीकडे अधिक गांभीर्याने पाहावे असे मत व्यक्त केले आहे..Viral Video: AI आलं अन् सगळंच बदललं! २०३२ चं जग पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल, आपली जागा कुठे? भविष्य अतिशय जवळून पाहा.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.