latur videoesakal
Trending News
Latur ladies constable video: लातूरच्या 'त्या' महिला पोलिस कर्मचाऱ्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल; वकिलाला धमकावलं
From Assaulting Girls to Threatening a Lawyer: Latur Police Officer's Controversial Actions Go Viral: ज्या मुलींना त्यांनी मारहाण केली त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देऊन सदरील महिला पोलिसाला निलंबित करण्याची मागणी केली आहे.
Viral Video: लातूरच्या एक महिला पोलिस कॉन्स्टेबल सध्या चर्चेत आहेत. त्याचं कारण त्यांनी दुचाकीवरुन चाललेल्या मुलींना केलेली मारहाण. केवळ मारहाणच नाहीच तर चक्क आर्वाच्च भाषेत केलेली शिवीगाळ; यामुळे त्या टीकेच्या धनी ठरत आहेत. या सगळ्या प्रकाराबाबत महिला कॉन्स्टेबलने माफी मागितली असतील तरी आता त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आलेली आहे. हे कमी की काय, त्यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.