LGBTQ Community : "आमचं लग्न आता लीगल होईल का?" लेस्बियन कपलने शेअर केला Emotional Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Emotional Video

LGBTQ Community : "आमचं लग्न आता लीगल होईल का?" लेस्बियन कपलने शेअर केला Emotional Video

सुप्रीम कोर्टाने समलैंगिक विवाहाला बंदी घातल्यानंतर आता समलैंगिक विवाह केलेल्या एका जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेस्बियन कपल यश्विका आणि पायलने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लाईव्ह येत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या दोघींचं लग्न झालेले आहे पण कायद्यानुसार त्यांच्या लग्नाला मान्यता नसल्यामुळे त्यांनी आपला संताप यामध्ये व्यक्त केला आहे.

"आम्ही स्वत:वर विश्वास ठेवून आहोत, येणाऱ्या दिवसांत काय होईल ते पाहूया" असं यश्विका व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे. त्याचबरोबर LGBTQ समुदायातील अनेकजण त्यांना विवाहाबद्दल विरोध करत असल्याचं तिने सांगितलं. या समुदायाला लोकं वेगळं का समजतात? असा प्रश्न तिने यावेळी उपस्थित केला.

"आम्ही आमच्या लग्नाची प्रत्येक गोष्ट समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. कारण की समाजाला ही गोष्ट सामान्य वाटावी. पण आमच्या समुदायापेक्षा सामान्य लोकं आम्हाला जास्त पाठिंबा देतात. तर आमच्या समाजातील लोकं आमच्या लग्नावरच प्रश्न उपस्थित करतात." असं यश्विकाने सांगितलं.

आम्ही लग्न केलं आहे पण सुप्रीम कोर्टाने या लग्नाला मान्यता दिली नसल्याने आता आमचं लग्न अधिकृत आहेत की अनधिकृत आहे असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचं त्यांनी सांगितलं.