

Lion viral video
Sakal
Lion viral video: जंगलाचा राजा सिंह तुम्ही नेहमीच ऐकले असेलच. सिंह हा एक शक्तीशाली आणि बलाढ्य प्राणी आहे. आतापर्यंत अनेक वेळा सिंहाचे भयंकर रूप पाहिले असेल पण सध्या सोशल मिडियावर सिंहाचा एक व्हिडिओ पाहून तुम्ही प्रेमात पडाल. सिंहाचा एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळतो आहे. हवेसोबत त्याचे कुरळे केस उडत आहे, तो एका हॉलिवूड हिरोप्रमाणेच दिसत आहे. या व्हिडिओत सिंह एकटाच फिरतांना दिसत आहे. सिंहाची हेअरस्टाइल पाहून तुम्हीही प्रेमात पडाल. सिंहाचे असे कुरळी केस पावसात भिजल्याने झाले असावे असा अंदाज लावला जात आहे.