
सध्या गणपती उत्सवामुळे देशभरातील गणेशभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. काही ठिकाणी दीड दिवसांचा, काही ठिकाणी सात दिवसांचा गणपती बसवला जातो. तर लहान लेकरांना सुद्धा गणपती बाप्पाची भुरळ पडलेली असते. सध्या अशाच एका चिमुकल्याचा आणि त्याच्या वडिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेला पितापुत्रांचा विनोदी व्हिडिओ पाहून आपल्याला हसू आवरणार नाही. आपल्या लेकराचा हट्ट पुरवण्यासाठी पिता आपल्या लहान मुलाला हातावर उचलून घेत त्याला गणपती बाप्पासारखी मुद्रा करायला सांगतात. त्यानंतर चिमुकला "गणपती बाप्पा मोरया" अशा घोषणा देतो. काही वेळात सदर पिता खाली हात घेतात तेव्हा "मला पाण्यात टाका" असं हा चिमुकला म्हणतो.
दरम्यान, व्हिडिओ काढत असलेली चिमुकल्याची आईसुद्धा या छोट्या गणपती बाप्पाची इच्छा ऐकून हसायला लागते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात असून अनेकांनी त्यावर आपल्या विनोदी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ट्वीटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. नेटकऱ्यांची या व्हिडिओला पसंती मिळत आहे.