
viral video of toddler with injection: लहान मुले ही देवा घरची फुले असे आपण बोलत असतो. खरंच लहान मुले ही मनानी स्वच्छ आणि निर्मळ असतात. चांगले किंवा वाईट असे काही त्यांना कळत नसते.तसेच लहान मुले कधी काय करतील हे सांगता येत नाही. कधीकधी त्यांच्या मजेदार कृतीने सर्वांच्या चेहऱ्यावर हसु येतं.कधी लहान मुले खोटं खोटं ब्युटिशयन होतात तर कधी स्वयंपाक बनवतात तर कधी डॉक्टर होतात. सोशल मिडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात लहान चिमुकली डॉक्टर बनली आहे.