Maharashtra Din 2023 : दुरूनच नेत्रसुख देणारे लोणार सरोवर 'या' कारणांनी आहे पर्यटकांचे विशेष आकर्षण

त्यापलीकडेही या सरोवराची अनेक अशी वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे पर्यटक दुरवरून या ठिकाणाला भेट द्यायला येतात
Maharashtra Din 2023
Maharashtra Din 2023esakal

Maharashtra Din 2023 : महाराष्ट्राला अनेक नैसर्गनिर्मित सुंदर ठिकाणांचा वारसा लाभलेला आहे. जगभऱ्यातील पर्यटकांचं आकर्षण असलेली ठिकाणे भारतात आहेत. त्यामुळे विकेंडला तुम्हाला भारतासह विदेशी पर्यटकांची गर्दीही या ठिकाणांवर दिसून येईल. महाराष्ट्रीतल बुवढाणा जिल्ह्यातील असंच एक ठिकाण, 'लोणार सरोवर'

उल्कापाताने तयार झालेलं हे निसर्गनिर्मित सरोवर, मात्र एवढीच याची प्रसिद्धी नाही. त्यापलीकडेही या सरोवराची अनेक अशी वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे पर्यटक दुरवरून या ठिकाणाला भेट द्यायला येतात. चला तर या सरोवराची खासियत आज आपण जाणून घेऊया. जेणेकरून तुम्हाला लाँग विकेंडला किंवा यंदा महाराष्ट्र दिनी १ मे ला तुम्हाला या ठिकाणी जाता येईल.

अग्निजन्य खडकात निर्माण झालेलं खाऱ्या पाण्याचं हे एकमेव जगप्रसिद्ध सरोवर आहे. या सरोवराचं वय ४७००० हजार वर्ष जुनं असल्याचं अनुमान काढल्या जातं. हे सरोवर १.७ किमी भागात पसरलेलं आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार भगवान विष्णूनं लवणासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. या राक्षसाच्या नावावरूनच या परिसराला लोणार असं नाव पडलं.

ब्रिटिश राजवटीमध्ये जे. ई. अलेक्झांडर यानं या सरोवराची नोंद केली आहे. त्याचबरोबर आईने अकबरी, पद्मपुराण आणि स्कंदपुराणातही या विवराचा उल्लेख आढळतो. प्राचीन ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख विरजतीर्थ किंवा बैरजतीर्थ असा करण्यात आला आहे. या सरोवराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती व शेवाळ तयार झाले आहे. या परिसरात सुमारे १२०० वर्षांपूर्वींची मंदिरे असून वर्षभर वाहणारे गाेमुख आहे.

लोणार सरोवराचा परिसर अत्यंत मनमोहक आहे. बघता क्षणी तुम्ही या परिसराच्या प्रेमात पडाल. या ठिकाणी तुम्ही कधीही भेट देऊ शकता. या ठिकाणाचं सौंदर्य लोणार सरोवरामुळे वाझढं. सरोवराच्या पाण्याचा देखणा रंग आणि सभोवताल दूरवर पसरलेला निसर्गरम्य परिसर असं एकंदरित दृष्य बघताना मन भारावून जातं. (Amazing Tourist Places)

Maharashtra Din 2023
Maharashtra Din 2023 : कोकणातलं अनोखं गाव, प्रत्येक घरात २४ तास पोहचतं डोंगराचं पाणी...

लोणार सरोवराचा रंग गुलाबी झाला असे व्हिडीओ आणि फोटो मध्यंतरी सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. सरोवराच्या लाल गुलाबी लाल पाण्याबद्दल नेरी शास्त्रज्ञ डॉ. गजानन खडसे (सीनिअर प्रिंसिपल सायंटिस्ट) यांनी मात्र त्यावेळी माहिती दिली होती.

'पाण्यामध्ये असेलेल्या सजिवांना आणि पाण्याच्या क्षारतेतून (सलेनिटी) त्यांना उष्णता तसंच विरघळलेल्या स्वरूपाचा ऑक्सिजन मिळाला तर तिथे पिग्मेंटेशन होऊन रंग बदलतो. जर केरोटीन सारखे पिग्मेंटेशन तयार झाले तर त्याला लाल रंग प्राप्त होतो. जर शेवाळासारखी वनस्पती असली तर त्यामध्ये क्लोरोफीलमुळे हिरवा रंग प्राप्त होतो. तर या ठिकाणी लाल रंगाचे पिग्मेंटेशन तयार झाल्यामुळे व त्यावेळी पाण्याची पातळी कमी असून क्षार जास्त प्रमाणात  असल्याने सरोवराला लाल गुलाबी रंग प्राप्त झाला असेल, असं मत  डॉ. गजानन खडसे यांनी व्यक्त केलं होतं. (Maharashtra Din)

बुलडाणा परिसरात बेसॉल्ट जातीचा दगड सापडतो. पृथ्वीवर ज्या काळात अनंत ज्वालामुखी होते, त्या काळात लाव्हारसामुळे या खडकाची निर्मिती झाली. या विवरात कालांतरानं पाणी जमा झालं. अमेरिकेतली स्मिथसोनियन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे आणि जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी यासारख्या नामवंत संस्थांनी या सरोवरावर बरंच संशोधन केलं आहे. या परिसरात सुमारे १२०० वर्षांपूर्वीची मंदिरं आहेत. त्यापैकी १५ मंदिरं विवरातच आहेत. मुख्य सरोवरापासून जवळच झाेपलेल्या अवस्थेतील हनुमानाचं मंदिर आहे. सरोवर परिसरात व गावात दैत्य सुदन मंदिर, कमळजा देवी मंदिर, चुंबकीय मोरोती, महादेव मंदिर, सीता मंदिर अशी अनेक धार्मिक ठिकाणे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com