सर्विसिंग न करताच AC वापरणं पडू शकतं महागात, आरोग्यही येईल धोक्यात

अनेक जण एसीच्या सर्व्हिसिंगकडं दूर्लक्ष करतात. AC चांगलं काम करत आहे म्हणजे सर्व्हिसिंगची गरज नाही असा अनेकांचा समज असतो. मात्र हा समज चुकीचा आहे
ac service tips
ac service tipsEsakal

Air Conditioners Maintenance: गेल्या काही वर्षात वातावरणातील बदलांमुळे उन्हाळ्यातील गरमीचं प्रमाणाही वाढलं आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये दरवर्षीच एसी Air Conditioners बसवले जाऊ लागले आहेत.

AC ही आता घरातील एक गरजेची वस्तू बनली आहे. मात्र घरात AC चा वापर करत असताना एक गोष्ट लक्षात घेणं अत्यंत महत्वाची आहे. ती म्हणजे एअर कंडिशनरचं सर्व्हिसिंग. Maintain your home Air Conditioner by regular servicing

अनेक जण एसीच्या सर्व्हिसिंगकडं दूर्लक्ष करतात. AC चांगलं काम करत आहे म्हणजे सर्व्हिसिंगची गरज नाही असा अनेकांचा समज असतो. मात्र हा समज चुकीचा आहे. AC ची वर्षातून दोनदा तरी सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे.

AC च्या सर्व्हिसिंगवेळी अनेक गोष्टी योग्य काम करत आहेत का तपासल्या जातात. यावेळी फिल्टर स्वच्छ किंवा बदलला जातो. तसचं कॉप्रेसर, पंखा आणि AC मधील कॉईल या गोष्टी योग्य काम करत आहेत का हे तपासल्या जातात.

आवश्यक गोष्टींची स्वच्छता, दुरुस्ती किंवा त्या बदलल्या जातात. शिवाय AC ची सर्विसिंग ही तुमचा AC चा वापर तसचं तुम्ही कुठे राहता यावरही अवलंबून असते.

जर तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी अधिक प्रदूषण आणि धुळ असेल तर तुम्हाला सर्विसिंगची जास्त वेळा गरज भासू शकते. मात्र ही सर्व्हिसिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे. AC ची योग्य वेळेत सर्व्हिसिंग न केल्यास तुमच्या आरोग्यासाठी ते हानिकारक ठरू शकतं. 

ac service tips
Air Conditioner Height : घर ‘थंडा थंडा कुल कुल होण्यासाठी’ AC किती उंचीवर लावावा?

1. कार्बन मोनोऑक्साइड निर्माण करणं- AC ची वेळेत सर्व्हिसिंग न केल्यास त्यातून कार्बन मोनोऑक्साइचे उत्सर्जन होवू शकतं जे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

यामुळे खोलीमध्ये गारवा निर्माण झाला तरी जीव गुदमरल्यासारखा होवू शकतो. कार्बन मोनोऑक्साइडमुळे शरीरातील ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर परिणाम होतो. बंद खोलीत जर कार्बन मोनोऑक्साइडचं प्रमाण वाढलं तर शुद्ध हरपू शकते. 

२. जीव गुदमरणे- एअर कंडिशनरची नियमित सर्व्हिसिंग न केल्यास त्यात जमा होणारी घाण आणि धूळ ही श्वसनातून फुफ्फुसात जावू शकते. दम्याचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी हे धोकादायक ठरू शकतं. यामुळे गुदमरल्यासारखे वाटू शकते. 

3. डोके दुखी- एअर कंडिशनरमधुन निघणाऱ्या क्लोरो फ्लोरोमुले आपल्या शरीरावर थेट परिणाम होत नसला तरी हा गॅस लिक होवून वातावरणात मिसळल्यास ते नुकसानदायक ठरू शकतं. यामुळे दोकेदुखीचा त्रास होवू शकतो.

४. कार्यक्षमतेवर परिणाम- एसीचं वेळोवेळी मेंटेनेन्स न झाल्यास एअर कंडीशनर खूप लवकर बिघण्याची शक्यता असते. सर्व्हिसिंग न केल्यास हळू हळू एसीची एफिशिएंसी म्हणजेच कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो. यामुळे एसी लवकर बिघडू शकतो आणि तुमच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते. 

५. एअर फिल्टरची काळजी घेणं गरजेचं- एसीची कुलिंग करण्याची कार्यक्षमता टिकून राहण्यासाठी नियमितपणे एअर फिल्टर साफ करणं किंवा बदलणं गरजेचं असतं. तुम्ही कुठे राहता आणि तुमचा एसीचा वापर किती आहे यावर एअर फिल्टर किती वेळा साफ करावा किंवा बदलणं गरजेचं आहे हे ठरत असतं.

एअर फिल्टर खराब असल्यास त्याचा परिणाम तुमच्या एसीच्या कुलिंगवर तसचं इलेक्ट्रिसीटी कन्झप्शनवर होवू शकतो. त्यामुले तुम्हाला अधिक वीज बील येऊ शकतं. यासाठीच एसीची सर्विसिंग गरजेची आहे. 

एकंदरच एअर कंडिशरचं आयुष्य वाढवण्यासाठी त्याची काळजी घेणं म्हणजेच वेळोवेळी सर्व्हिसिंग करणं अत्यंत आवश्यक आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com