Viral Video : "मॅडम गुटखा थुंकायचाय, विमानाची खिडकी उघडा" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : "मॅडम गुटखा थुंकायचाय, विमानाची खिडकी उघडा"

तुम्ही कधी विमानात बसून प्रवास केलाय का हो? जेव्हा तुम्ही पहिल्यांदा प्रवास केला असेल तेव्हा तुमची बरीच तारांबळ उडाली असेल. विमानाच्या खिडक्या उघडत नसल्यामुळे अनेकांचा पहिल्यांदा प्रवास करताना बराच गोंधळ उडतो. त्यामुळे विमात बसताना अगोदर कुणीतरी अनुभवी व्यक्ती सोबत पाहिजे.

हेही वाचा - सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

सध्या अशाच एका विनोदी तरूणाचा विमानातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो विमानातील एअर होस्टेसला खिडकी उघडण्याची विनंती करत आहे. "मॅडम गुटखा थुंकायचा आहे, खिडकी उघडा ना..." असं तो एअर होस्टेसला म्हणताना या व्हिडिओत दिसत आहे.

दरम्यान, तरूणाने ही मागणी केल्यानंतर एअर होस्टेसही पोट धरून हसली. तर आजूबाजूचे लोकंही हसू लागले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा व्यक्ती विमला वाला आहे का? असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे.