
What happens if you stare at a snake’s eyes: सोशल मिडियावर अनेक विचित्र आणि मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक विचित्र व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुमच्या अंगावर काटाच येईल. या व्हिडिओमध्ये एक कोब्रा साप एका वृद्ध व्यक्तीच्या डोळ्यावर हल्ला करताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये जे काही कैद झाले आहे ते इतके भयानक आहे की ते पाहिल्यानंतर लोक घाबरतात. व्हिडिओच्या सुरुवातीला, एक कोब्रा साप टेबलावर बसलेला दिसतो, ज्याचा कणा पसरलेला आहे आणि त्याच्या समोर एक वृद्ध माणूस बसलेला आहे, जो त्याच्याकडे खूप बारकाईने पाहत आहे आणि हळूहळू त्याचा चेहरा त्याच्या अगदी जवळ नेत आहे. तो सापाच्या डोळ्यात थेट पाहत आहे, तेवढ्यात अचानक साप त्याच्यावर झडप घालतो आणि त्याच्या डाव्या डोळ्याला थेट चावतो.