
Viral Video : ''या' शोधासाठी नोबेल पुरस्कार द्या!' बाथरूममधील हवेच्या मशीनखालीच...
भारतात टॅलेंटला कमी नाही, अनेक जुगाडू लोकं इथं सापडतात. एखाद्या वस्तूचा वापर अनेक कामासाठी कसा करायचा ते भारतातील जुगाडू लोकांपासून शिकलं पाहिजे. आत्तापर्यंत तुम्ही अनेक चांगल्या प्रकारचे जुगाड पाहिले असतील पण असा जुगाड तुम्ही पहिल्यांदाच पहात असाल.
हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी
सदर व्यक्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक व्यक्ती बाथरूममध्ये लावलेल्या हवेच्या मशीनखाली केसं सुकवताना आणि विंचरताना दिसत आहे. खरं तर हात धुतल्यानंतर ते हात सुकावेत यासाठी हे मशीन लावलेलं असतं. पण हा व्यक्ती या मशीनमधून बाहेर पडणाऱ्या हवेखाली केसं सुकवत आहे.
दरम्यान, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर विनोदी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर या व्यक्तीला शोधाची जननी म्हटलं गेलं असून या व्यक्तीला एखादा नोबेल पुरस्तार द्या अशी मागणी काही व्यक्तींनी सोशल मीडियावर केली आहे. आयपीएस अधिकारी अरिफ शेख यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.