Summer Special: उन्हाळ्याच्या दिवसात साखर नव्हे तर खडीसाखर देईल पोटाला थंडावा, जाणून घ्या फायदे

साखरेप्रमाणेच दिसणारी खडीसाखर ही देखीस साखरेप्रमाणे गोड असली तरी तिचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत.
खडीसाखरेचे फायदे
खडीसाखरेचे फायदेEsakal

उन्हाळा हा अंगाची लाही लाही करणारा ऋतू. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गरमीने आणि उन्हाच्या तडाख्याने जीव देहाल होतो. अशात सतत काही ना काही गार प्यावं. तसचं पोटाला आणि शरीराला थंड ठेवण्यासाठी आपण गार पेय किंवा फळ खाण्यावर भर देतो. वाढत्या गरमीमुळे शरीरातही अनेक बदल घडतात. Marathi Health Tips Benefits of Rock Sugar

जसं जसा पारा वाढत जातो तसचं तशी डिहायड्रेशन होण्याची, अपचनाची समस्या वाढू शकते. थकवा आणि मरगळ येते. अनेकदा रक्तदाब Blood Pressure नियंत्रणात राहत नाही. बऱ्याचदा उन्हात बाहेर पडताना आपण पाण्याची Water बाटली किंवा एखादं चॉकलेट सोबत ठेवतो. पण त्याचसोबत आणखी एक गोष्ट तुमच्या सोबत असेल तर उन्हाळ्यात तुम्हाला उष्माघात, भोवळं येण यासोबतच अनेक समस्यांपासून सुटका होईल. हा पदार्थ म्हणजे खडीसाखर.

साखरेप्रमाणेच दिसणारी खडीसाखर ही देखीस साखरेप्रमाणे गोड असली तरी तिचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. साखर ही आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यापेक्षा खडीसाखर ही तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करू शकते. 

शरीर थंड राहण्यास मदत- खडीसाखर ही एक नैसर्गिक कुलंट आहे. म्हणजेच तिच्यात थंड प्रवृत्ती आहे. यामुळे शरीर थंड राहण्यास मदत मिळते. खडीसारख आधी तुमच्या पोटाला थंडावा देते त्यानंतर पाचन क्रियेस मदत करते.यामुळे पोटाचं कार्य सुरळीत चालू राहत आणि शरीराला एसिडीटी तसचं पोट फुगण्याच्या समस्यांपासून दूर ठेवतं.

पोटाचं pH लेव्हल नियंत्रणात ठेवतं- खडीसारख पोटाचं pH लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करत. तसचं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास फायदेशीर ठरतं.

तोंडातील जखमांवर उपाय- खडीसाखरेमुळे उन्हाळ्याच्या Summer दिवसांमध्ये तोंडात येणाऱ्या लाल व्रणांपासून आराम मिळतो. 

एनर्जी बुस्टर- खडीसाखरही चवीला गोड Sweet असल्याने तोंडाची चव वाढण्यास तर मदत होतेच शिवाय यामुळे शरीराला एनर्जी मिळते आणि मूडही चांगला होतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थकवा किंवा मरळग जाणवत असल्यास एखादा खडीसाखरेचा तुकडा चघळावा. यामुळे एनर्जी येईल. 

हे देखिल वाचा-

खडीसाखरेचे फायदे
Sugar Alternatives : साखरेचं अतिसेवन धोक्याचं; साखरेला या 6 नॅचरल गोष्टींनी रिप्लेस करा

खडीसाखरेचं पाणी- खडीसाखरेचं पाणी प्यायल्याने अनेक फायदे होतात. खडीसाखरेचं पाणी प्यायल्याने शरीर आणि डोक्याला थंडावा मिळतो. तसंच ताण तणाव कमी होण्यास मदत होते. 

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काहीजणांना नाकातून रक्त येण्याची समस्या उद्भवते. यासाठी खडीसाखर खाणं उपयुक्त ठरू शकतं. खडीसाखर खाल्ल्याने नाकातून रक्त येणं त्वरित बंद होतं. 

उन्हाळ्यात एनर्जी बूस्ट करण्यापासून ते पचन क्रियेस मदत करणं हे तर खडीसाखरेच्या सेवनाचे फायदे आहेतच. याशिवाय इतरही अनेक समस्यांसाठी खडीसाखर गुणकारी आहे. 

  • खडीसाखर डोळ्यांसाठी चांगली असते.

  • आयुर्वेदामध्ये खडीसाखर शुक्रवर्धिका म्हणून वापरली जाते. म्हणजेच पुरुषांमधील स्पर्म काउंट वाढण्यासाठी याची मदत होते.

  • खडीसाखर खाल्ल्याने रक्तपित्तहर म्हणजेच रक्तातील एसिड लेव्हर नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

  • वात कमी करण्यासाठी देखील खडीसाखरेचं सेवन फायदेशीर ठरतं

  • सर्दी खोकला कमी करण्यासाठी खडीसाखर गुणकारी आहे. 

  • उलटी आणि मळमळ जाणवत असल्यास खडी साखर चघळावी. 

खडीसाखर आणि बडीशेप

खडीसाखरेचं बडीशेप सोबत सेवन केल्यासही अनेक फायदे जाणवतात. मधुमेही रुग्णांनी खडीसाखर आणि बडीशेपचे पाणी प्यायल्यास फरक जाणवतो. त्याचप्रमाणे महिलांना मासिक पाळीमध्ये सकाळच्या वेळी बऱ्याचदा मळमळ आणि अशक्त पणा जाणवतो. यासाठी खडीसाखर आणि बडीशेपच्या पाण्याचे सेवन उपयुक्त ठरतं. त्याचप्रमाणे खडीसाखर आणि बडीशेपचे सेवन केल्यास शरीरातील आयर्नचे प्रमाण वाढतं. हिमोग्लोबीन वाढल्याने ब्लड फ्लो सुरळीत होण्यास मदत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com