Viral Video : मस्ती नडली! तरूणीला इम्प्रेस करायला गेला अन् पोहचला थेट हॉस्पिटलात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : मस्ती नडली! तरूणीला इम्प्रेस करायला गेला अन् पोहचला थेट हॉस्पिटलात

काही मुलांना स्टंट करण्याची सवय असते. ते आरामात बॅक फ्लिप मारू शकतात. प्रत्येकाला असे स्टंट जमत नाहीत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक तरूण दुसऱ्या तरूणीला इम्प्रेस करण्यासाठी बॅक फ्लिप मारण्याचा प्रयत्न करतो आणि पाय मोडून घेतो.

व्हायरल झालेला व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओत पाठीमागे एक जोडपं बसलेलं आहे. आणि त्यांच्या समोर एक तरूण त्या तरूणीला इम्प्रेस करण्यासाठी उडी मारतो आणि त्याचा पाय मोडतो. पायाच्या पंजाचे हात मोडल्यामुळे या तरूणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पण या तरूणाला मस्ती नडली अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.