Viral Video : नाद खुळा! टॉवेल गुंडाळून आलेल्या बनियनवरील पठ्ठ्याचा मेट्रोत 'स्वॅग' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Viral Video : नाद खुळा! टॉवेल गुंडाळून आलेल्या बनियनवरील पठ्ठ्याचा मेट्रोत 'स्वॅग'

काही लोकं स्टंट करण्यासाठी माहीर असतात. काहीतरी स्टंट करून लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेत असतात. मुंबईच्या बीचवर उलट्या उड्या मारून स्टंट करणारे किंवा गर्दीच्या ठिकाणी काहीतरी अनोखा शो करणारे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील. अशाच प्रकारच्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(Man with towel in metro viral video)

हेही वाचा - Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

मोहित गौहार या इंस्टाग्राम अकाउंटरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ पाहून मेट्रोमधील अनेक प्रवासी हसताना दिसत आहे. तर या मुलाचा स्वॅग पाहण्यासारखा आहे. टॉवेल गुंडाळून आणि बनियनवर आलेला हा तरूण हाताने केसाला भांग पाडताना दिसत आहे. तर मेट्रोच्या डब्यामध्ये या तरूणाला पाहून चांगलाच हशा पिकला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर या व्हिडिओमुळे अनेक नेटकऱ्यांचे मनोरंजन होत असते. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :Metroviral video