असंही एक शहर! दरवाजातून आत गेल्यावर दिसतं असं काही, जे जगात कुठेच नाही, थांबतं वेळेचं चक्र!

Where Is Monemvasia, the Famous Rock City of Greece? : ग्रीसमधील मोनेम्वासिया हे एकमेव प्रवेशद्वार, वाहनांना बंदी आणि शेकडो वर्षांचा ऐतिहासिक वारसा जपणारे समुद्रातील अनोखे शहर आहे.
असंही एक शहर! दरवाजातून आत गेल्यावर दिसतं असं काही, जे जगात कुठेच नाही, थांबतं वेळेचं चक्र!
Updated on: 

ग्रीसमधील मोनेम्वासिया हे शहर आपल्या अनोख्या रचनेमुळे आणि ऐतिहासिक वारशामुळे जगभरातील पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. समुद्राच्या निळ्याशार लाटांच्या सान्निध्यात एका विशाल खडकावर वसलेले हे शहर 'फ्लोटिंग कॅसल' आणि 'रॉक सिटी' म्हणून ओळखले जाते. या शहरात प्रवेश करताच आधुनिक जगातील गजबज, वाहनांचा आवाज आणि धावपळ मागे पडते. अरुंद दगडी रस्ते, शेकडो वर्षे जुन्या इमारती आणि समुद्राची गाज अशा वातावरणात पर्यटकांना इतिहासाच्या काळात आल्याचा अनुभव मिळतो.

Loading content, please wait...