Video: घरात शिरलेल्या माकडाने किचनमध्ये केला राडा; महिलांच्या किंचाळ्या अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Video: घरात शिरलेल्या माकडाने किचनमध्ये केला राडा; महिलांच्या किंचाळ्या अन्...

माकड एकदा रागावले की काय करू शकतात याचा आपण अंदाज लावू शकत नाही. आपण फिरायला गेल्यावर त्याने आपल्या हातातील खाद्यपदार्थ हिसकावून घेतल्याचं आपण अनेकदा ऐकलं असेल किंवा अनुभवलं असेल. तर लहान मुलांच्या हातातील वस्तू माकडांकडून हमखास हिसकावून घेतल्या जातात. अशाच एका माकडाचा घरातील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

(Monkey In Kitchen Viral Video)

हेही वाचा - Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये माकडाची प्रजातीतील बबून घरात घुसल्याचं आपल्याला दिसत आहे. तर घरातील किचनमध्ये तो राडा करत आहे. घरातील महिला त्याला पाहून घाबरल्या असून किंचाळण्याचा आवाज या व्हिडिओमध्ये येत आहे. तर हा बबून किचनमध्ये नासधूस करत आहे. घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडल्या असून चिप्सचं पाकीट फोडताना या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Video: आईचा डान्स अन् पोरगं करतंय शूट; पण त्याने वेगळंच केलं

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

टॅग्स :womenMonkeyviral video