
Video Viral : 'पतली कमरिया'वर आता माकडानेही मारले ठुमके; या डान्सपुढे पोरीही फिक्या
सध्या सोशल मीडियावर पतली कमरिया हे गाणं धुमाकूळ घालत आहे. तर अनेक मुली या गाण्यावर रील्स बनवून सोशल मीडियावर टाकत आहेत. तर या गाण्याने तरूणाईला अक्षरश: वेड लावलं आहे. पण या गाण्यावर चक्क माकड डान्स करत असेल तर? आपला विश्वास बसणार नाही पण हो. हे खरं आहे.
हेही वाचा - शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून
या माकडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असून त्यामध्ये ते 'पतली कमरिया' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ जरी एडिटेड असला तरी हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. माकड हुला हूप हा गेम खेळताना दिसत आहे.
दरम्यान, इंस्टाग्रामवरील हा व्हिडिओ सध्या युजर्सच्या मनोरंजनाचं साधन बनला आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या कमेंट केल्या आहेत. या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.