
Monkey Viral Video : वाराणसीत एका माकडाने पतंग उडवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओने लोकांचे लक्ष वेधले असून, आतापर्यंत 4.52 लाख वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. माकडाचा हा कौशल्यपूर्ण व्हिडिओ पाहून लोक थक्क झाले आहेत.
व्हिडिओमध्ये एक माकड दोर पकडून (हिंदीत ज्याला ‘मांजा’ म्हणतात) कुशल पतंगबाजासारखा पतंग उडवताना दिसत आहे. पतंग उडवताना त्याचा आत्मविश्वास आणि सहजतेने उडवण्याचा शैली पाहून स्थानिकांसह नेटिझन्सही अचंबित झाले आहेत.
‘Dalimss News’ या पेजने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले, “आकाशातील अनोख्या कसरतीत वाराणसीतील एका खोडकर माकडाने पतंगावर ताबा मिळवला आणि लोकांना अचंबित केले. या माकडाचे हे कौशल्य पाहून पतंगबाजीच्या स्पर्धांमध्येही ते झळकू शकते.”
व्हिडिओ पाहून लोक सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
एका युजरने लिहिले, “हे फक्त भारतातच शक्य आहे.” यामुळे भारतातील विचित्र पण मनोरंजक व्हायरल क्षणांवर प्रकाश टाकला आहे.
दुसऱ्या एका युजरने माकडाच्या कौशल्याचे कौतुक करत लिहिले, “तुम्हाला कल्पना नाही, माकडे काय-काय करू शकतात.”
काही युजर्सनी विनोदी प्रतिक्रिया देत म्हटले, “त्याच्याकडे पतंग पकडायला माकड-मित्रही नाही.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले, “माकड म्हणत असेल - आज पतंग तुमचा भाऊ उडवेल!”
ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा माकडाचा असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यापूर्वी एका माकडाचा ‘हरे राम’ आणि ‘श्री राम जय राम’ च्या मंत्रांना प्रतिसाद देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये एक महिला एका रेस्टॉरंटमध्ये मंत्रोच्चार करताना दिसते, तर माकड ते मंत्र ऐकून मंत्रमुग्ध झाल्यासारखे तिला बघत राहते. काही क्षणांनी ते माकड महिलेकडे झेप घेत तिच्या मांडीवर बसते, आणि मंत्रोच्चार चालू असतानाच भक्तिभावाने डोकं हलवू लागते. मंत्रांचा आवाज वाढत असताना माकड अधिक भावूक होत त्या महिलेला मिठी मारते.
वाराणसीतील या अनोख्या माकडाच्या पतंगबाजीचा व्हिडिओ आणि त्याला मिळणाऱ्या प्रतिक्रिया पाहून, माकडांचे कौशल्य आणि मनोरंजनाचा साक्षात्कार लोकांना पुन्हा एकदा झाला आहे. अशा व्हिडिओंनी सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.