Viral Video : शेवटी आईच ती! लेकराला वाचवण्यासाठी स्वत: दिला जीव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deer Viral Video

Viral Video : शेवटी आईच ती! लेकराला वाचवण्यासाठी स्वत: दिला जीव

आई ही आईच असते. जगात आईची जागा दुसरी कोणतीच व्यक्ती घेऊ शकत नाही. आपल्या पिल्लांना सांभाळायला तिने स्वत:ला वाहून घेतलेलं असतं. कोणतीही परिस्थिती आली तरी आई आपल्या पिल्लांना उपाशी ठेवत नाही. जर एखादं संकट आलं तर ते आपल्यावर घेऊन पिल्लांचं रक्षण करत असते. अशाच एका आईचा व्हिडिओ समोर आलाय.

हेही वाचा - गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

ट्वीटरवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हरिणीचं पिल्लू पाण्यात पोहत असून त्या पिल्लाकडे मगर येताना दिसत आहे. आपल्या पिल्लाला खाण्यासाठी मगर येताना पाहून हरिणीने पाण्यात उडी मारली आणि मगरीच्या पुढे गेली. मगरीने आईला खाल्लं आणि त्यानंतर पिल्लू सुखरूप पाण्यातून बाहेर आलं आहे.

दरम्यान, पिल्लाला वाचवण्यासाठी आईने आपला जीव दिला असून पिल्लू सुखरूप आहे. हा हृदयद्रावक व्हिडिओ पाहून आपल्यालाही आपल्या आईची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक आई आपल्या लेकरांसाठी जीव द्यायला पण मागेपुढे पाहत नाही. ट्वीटरवर हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.