
Mumbai Latest News: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विलेपार्ले येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर एका एर्टिगा कारचालकाने एका तरुणाला आपल्या गाडीच्या बोनेटवर फरपटत नेल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून, कारचालकाकडून तरुणाच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रयत्न असल्याचे व्हिडिओ पाहणाऱ्यांनी म्हटले आहे.