मोदींना परदेशात जेवढा मान तेवढा अपमानही; फोटोला चप्पलांचा हार घालून काढली मिरवणूक | Video Viral

त्यांच्या फोटोला चप्पलेचा हार घातलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Viral Video
Viral VideoSakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असून त्यांनी गुरूवारी व्हाईट हाऊसमध्ये पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. त्याचबरोबर अमेरिका सरकारकडून त्यांचा मोठ्या उत्साहाने स्वागत करत मानसन्मान केला. स्टेट डिनर पार्टीमध्येसुद्धा त्यांना अमेरिकेकडून बराच मान मिळाला पण सध्या त्यांच्या फोटोला चप्पलेचा हार घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral Video
Viral Video : मी नाय जा! तरूणीने मांजरीला मारली मिठी; बोका बसला रुसून

"मोदी हे भारतीय दहशतवादाचा चेहरा आहेत" असं या फोटोवर लिहिण्यात आलं असून नागरिकांनी पोस्टरबाजी केली आहे. तर त्यांच्या जवळपास दहा फूट उंचीच्या फोटोला चप्पलेचा हार घालून त्याची मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी त्यांच्याविरोधात घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली आहे.

त्यामुळे जेवढा मान मोदींना परदेशात मिळतो तेवढाच त्यांना अपमानही मिळतो हे यातून दिसून येत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. @Ashoswain या ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून "सकाळ माध्यम" व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याला तेथील भारतीय वंशाच्या अनेक नेत्यांचा आणि नागरिकांचा विरोध होता असं सांगण्यात येत आहे पण त्यांचे आगमन झाल्यावर अमेरिका सरकारकडून त्यांचे आदराने स्वागत करण्यात आले. यावेळी दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय संबंध दृढ होतील अशी आशा दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, अमेरिकन सरकारने दिलेल्या डिनर पार्टीसाठी उद्योग, व्यवसाय, चित्रपट, राजकीय जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये भारताचे अब्जाधीश मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी, आनंद महिंद्रा, प्रसिद्ध चित्रपट निर्माते एम. नाईट श्यामलन, अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, प्रसिद्ध फॅशन डिझायनर राफ लॉरेन, माजी टेनिस दिग्गज बिली जीन किंग, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांचा सामावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.