Viral Video: नवरदेवाची गाढवावरून काढली मिरवणूक; वऱ्हाडींचा फुल्ल राडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video: नवरदेवाची गाढवावरून काढली मिरवणूक; वऱ्हाडींचा फुल्ल राडा

Viral Video: नवरदेवाची गाढवावरून काढली मिरवणूक; वऱ्हाडींचा फुल्ल राडा

एका नवरदेवाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या नवरदेवाची गाढवावरून मिरवणूक निघत आहे. सध्या हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे. तर नवरदेवाची गाढवावरून काढलेल्या मिरवणुकीचा व्हिडिओ पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही.

वाजत गाजत एक निघालेल्या या मिरवणुकीत एक नवरा मुलगा गाढवावर बसला असून इतर लोकं नाचत आहेत. त्याचबरोबर "आज मेरे यार की शादी है" या गाण्यावर वऱ्हाडी नाचत आहेत. या व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट येत आहेत.

दरम्यान, घोड्यावरून वरात निघताना आपण पाहिली असेल पण गाढवावरून वरात निघताना आपण पहिल्यांदाच पाहली असेल. काही गावांत जावयाला गाढवावर बसून मिरवणूक काढल्या जात असल्याच्या प्रथा आहेत पण लग्नात गाढवावर बसून वरात निघाल्याचा हा व्हिडिओ आपणही पहिल्यांदाच पाहत असाल.

टॅग्स :danceDonkeyviral video