Viral Video : 2024ला उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार; आजींचा पोस्टर घेऊन एल्गार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : 2024ला उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार; आजींचा पोस्टर घेऊन एल्गार

शिवसेनेचा वाद सुप्रीम कोर्टात असताना चिन्ह आणि पक्षाबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना पक्ष शिंदे गटाकडे राहिल असा मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय आयोगाने दिला आहे. त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून शिंदे गटावर निशाणा साधला जात आहे.

हेही वाचा - स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये एक आज्जी पोस्टर घेऊन चालताना दिसत आहेत. "२०२४ च्या लोकसभा निवडणुकांत उद्धव ठाकरेंचा विजय होईल आणि पुढचे पंतप्रधान 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे असतील." असा उल्लेख या पोस्टरमध्ये केला आहे.

चिन्ह आणि पक्ष उद्धव ठाकरे यांच्या हातून गेल्यानंतर कार्यकर्त्यांकडून शिंदे गटावर निशाणा साधला जात आहे. तर ठाकरे गटाच्या नेत्याकडून शिंदे गटाच्या नेत्यांवर आणि भाजपवर मोठे आरोप केले जात आहेत. पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी दोन हजार कोटीचा सौदा झाला असा दावा संजय राऊतांनी केला आहे.