Video Viral : याला म्हणतात खतरों का खिलाडी! 2 पाय अन् 2 सायकल सुसाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video Viral

Video Viral : याला म्हणतात खतरों का खिलाडी! 2 पाय अन् 2 सायकल सुसाट

काही लोकांना स्टंट करण्याची सवय असते. उड्या मारणे, बॅक फ्लिप मारणे, सायकलवर स्टंट करणे, गाडी चालवताना स्टंट करणे असे स्टंट अनेक जण करत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक व्यक्ती एकाच वेळी दोन सायकल चालवताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दोन सायकलच्या मध्ये उभा राहिला असून त्याने दोन सायकलवर एक एक पाय ठेवला आहे. तरीही तो सुसाट वेगाने सायकल चालवत असून स्टंटदेखील करत आहे. "हाच खरा खतरों का खिलाडी" अशा कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओखाली केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

टॅग्स :Cycle Rideviral video