Viral : सावधान! धबधब्याखाली थांबताना घ्या काळजी; Video पाहून थरकाप उडेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral : सावधान! धबधब्याखाली थांबताना घ्या काळजी; Video पाहून थरकाप उडेल

आपणही पावसाळ्यात अनेकदा फिरायला गेला असाल. तर अनेकवेळा पावसाळ्यात धबधब्याखाली भिजण्याचा आणि पोहण्याचा आपल्याला मोह आवरत नाही. पण पावसाळ्यात वातावरण आणि निसर्ग जेवढा हवाहवासा असतो तेवढाच तो धोकादायकसुद्धा असतो. तर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो पाहून आपलाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा इंडोनेशिया येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. काही महिला आणि पुरूष धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेत असताना अचानक डोंगराचा काही भाग कोसळून पर्यटकांच्या अंगावर पडतो आणि यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर हा भाग पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. हा थरकाप उडवणारा व्हिडिओ अंगावर काटा आणल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, पावसाळ्यात किंवा कोणत्याही ऋतूत फिरायला जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घ्यायला पाहिजे. पावसाळ्यात भूस्खलन होण्याच्या अनेक घटना घडत असतात त्यामुळे पर्यटकांनी काळजी घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर हिल स्टेशन किंवा थंड हेवच्या ठिकाणी, डोंगरावर फिरायला गेलेल्या पर्यटकांनी विशेष काळजी घ्यायला हवी.