Video : एक झाड अन् चार नाग, चाललंय काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cobra

Video : एक झाड अन् चार नाग, चाललंय काय?

तुम्हाला नाग पाहून भिती वाटते का? आणि वाटत असेल तर एकाच वेळी सात ते आठ फणा काढलेले नाग बघितल्यावर काय होईल? एवढे साप पाहून तुम्हीच नाही तर कुणाचाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. सध्या असाच नागांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एकाच झाडावर सात ते आठ नागोबा फणा काढून बसलेले आपल्या दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

(Cobra Viral Video)

या व्हिडिओत सात ते आठ साप एकाच झाडावर बसले आहेत. तर एकमेकांच्या अंगात घुसून फणा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढ्या सापांचा वेटोळा पाहून तुम्हाला भिती वाटेल. आणि एवढे साप एकत्र कसे असाही प्रश्न निर्माण होईल. दरम्यान हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ कुणी शूट केला आणि कुठला आहे याची माहिती समोर आली नाही. तर एवढ्या जवळून व्हिडिओ शूट करणे खूप धोकादायक असून असा जिवघेणे साहस करू नये. कारण साप कधीही दंश करू शकतात त्यामुळे आपण आपली काळजी घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :Cobraviral video