Viral Video : नवरदेवाने लग्नातंच दिलं नवरीला गाढव गिफ्ट; नेमकं काय आहे प्रकरण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Viral Video : नवरदेवाने लग्नातंच दिलं नवरीला गाढव गिफ्ट; नेमकं काय आहे प्रकरण?

लग्न म्हटलं की सर्वांच्या आनंदाचा दिवस असतो. सर्वजण लग्नात आपल्या मित्राला काय गिफ्ट द्याचचं त्याचा विचार करत असतात. तर काहीजण अनोखं गिफ्ट घेण्याचा विचार करतात. एका नवरदेवाने तर आपल्या बायकोला लग्नातंच गाढव गिफ्ट म्हणून दिलं आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे वाचा सविस्तर...

हेही वाचा - सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा पाकिस्तानातील आहे. अब्दुल समाद झिया याच्या लग्नातील हा व्हिडिओ असून त्याने आपल्या वारीसा नाव असलेल्या नवरीला गाढव गिफ्ट केलं आहे. त्याने तिला गाढव गिफ्ट का केलं याबद्दल त्याने या व्हिडिओत स्पष्टीकरण दिलं आहे. तर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा: Viral Video : कावळ्याने जीवनाचं सारंच सांगितलंय; नेमकं काय केलं पाहा...

अब्दुलने याबद्दल खुलासा करताना सांगितलं की, "मला मुके प्राणी आवडतात. त्यामध्ये मला गाढव खूप आवडते. लोकांनी नाव ठेवले तरी चालेले पण मला गाढवं आवडतात म्हणून मी माझ्या होणाऱ्या पत्नीला गाढव गिफ्ट केलं आहे" असं तो म्हणाला. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.